सांगली : जवळपास दोन दशकांनंतर सांगलीत महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन झाल्याने जिल्ह्यातील कलाप्रेमींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन कलाविश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन येथे सुरू झाले असून २२ फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
यंदा राज्यभरातील ३,४९० विद्यार्थ्यांकडून तब्बल ५,६८० कलाकृती प्राप्त झाल्या. त्यापैकी १,२७५ उत्कृष्ट कलाकृतींची अंतिम निवड करून त्यांची प्रदर्शनात मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे एकाची ठिकाणी राज्यभरातील नवोदित कलाकारांची विविध शैली, विषय आणि प्रयोग पाहण्याची संधी नागरिकांना मिळत आहे.
रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण, कला शिक्षक प्रशिक्षण, कला व हस्तव्यवसाय, मूलभूत अभ्यासक्रम आणि दिव्यांग विभाग अशा आठ विभागांमध्ये दालने सजविण्यात आली आहेत. प्रत्येक विभागातून उत्कृष्ट कलाकृतींना पारितोषिके दिली जाणार आहेत.
यंदा प्रथमच शासकीय रेखाकला परीक्षेतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थी आणि बालचित्रकला स्पर्धेतील राज्यस्तरीय विजेत्यांचाही गौरव करण्यात येणार आहे, ही या प्रदर्शनाची विशेष बाब आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार असून, विद्यार्थी, पालक आणि कलारसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हेही वाचा: सांगली जि.प. सत्तास्थापनेचा निर्णय मुंबईत; अध्यक्षपदासाठी अजित पवार गटाचा आग्रह, महायुतीसमोर नवा पेच.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









