सांगली : अनेक वर्षांपासून सांगली-मिरज मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीचे कारण ठरत असलेल्या 67 अनधिकृत खोक्यांवर अखेर महापालिकेने बुलडोझर चालवला. विश्रामबाग चौक (जुना जकात नाका) आणि दांडेकर बाजार परिसरातील अतिक्रमणे हटवून महापालिकेकडून रस्ता मोकळा करण्यात आला.
महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मोहिमेचे नेतृत्व केले.
नगररचना विभागाकडून संबंधित खोकीधारकांना पूर्वसूचना देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न हटवल्याने प्रशासकीय कारवाई करत सर्व 67 खोकी जमीनदोस्त करण्यात आली. कारवाईदरम्यान अतिक्रमण निर्मूलन विभाग, स्वच्छता विभाग तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
या अतिक्रमणांमुळे सांगली-मिरज मुख्य रस्त्यावर वाहतुकीची सतत कोंडी होत होती. कारवाईनंतर रस्ता रुंद झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
महापालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांविरुद्ध पुढेही अशी कारवाई सुरूच राहील, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा: दोन दशकांनंतर सांगलीत राज्य कला प्रदर्शन; 1,275 उत्कृष्ट कलाकृती, 22 फेब्रुवारीपर्यंत मोफत प्रवेश.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










