सांगली : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनाने मुख्य शासकीय कार्यक्रमाची अधिकृत रूपरेषा जाहीर केली आहे. सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी पोलीस परेड ग्राऊंड, विश्रामबाग येथे सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. हा समारंभ सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे.
मुख्य कार्यक्रम सुरळीत पार पडावा तसेच सुरक्षा व्यवस्थेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सकाळी ८.३० ते १०.०० वाजेपर्यंत कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय ध्वजारोहण समारंभ आयोजित करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. संबंधित कार्यालये, शासकीय संस्था व संघटनांनी आपले स्वतंत्र ध्वजारोहण समारंभ ८.३० पूर्वी किंवा १० नंतरच आयोजित करावेत, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय तसेच आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी किमान १५ मिनिटे आधी उपस्थितांनी आसनस्थ व्हावे, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग किंवा साहित्य सोबत आणू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिकाधिक नागरिकांना हा राष्ट्रीय सोहळा पाहता यावा यासाठी प्रशासनाकडून वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा: संगीतकार पलाश मुच्छलविरोधात सांगली पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; चौकशीची मागणी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










