मिरज : मल्लेवाडी (ता. मिरज) येथे मंगळवारी पहाटे चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत मंदिरासह चार घरांमध्ये चोरी केली. या कारवाईत चोरट्यांनी देवाच्या अंगावरील सोन्याचे दागिने, चांदीचे अलंकार आणि रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. एकाच रात्री पाच ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मंदिराचे पुजारी विशाल क्षीरसागर रात्री मंदिर बंद करून घरी गेल्यानंतर सकाळी पुजेसाठी आले असता मंदिराचे दरवाजे उघडे दिसले. आत जाताच देवाच्या अंगावरील दोन तोळ्यांची सोन्याची चेन, दोन बदाम, अर्धा तोळ्याची सोन्याची पेटी असे दागिने गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्याच रात्री चोरट्यांनी गावातील आणखी चार घरे फोडली.
हेही वाचा: दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा, भारत निर्लज्ज लोकांचा देश.
भास्कर क्षीरसागर यांच्या गोट्यातील एक शेळी, प्रदीप भोसले यांच्या घरातून ५० हजारांची रोख रक्कम, पिंटू मल्हारी शिंदे यांच्या घरातून साडेतीन ग्रॅम सोने, एक तोळा चांदी आणि २० हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेण्यात आला. चोरीनंतर ग्रामस्थांनी तत्काळ मिरज ग्रामीण पोलिसांना कळवले असून प्रकरणाची नोंद घेण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा: सांगलीत 28 सप्टेंबर रोजी ‘नमो रन मॅरेथॉन 2025’.