Sangli News | सांगली : जिल्ह्यात सुगंधी तंबाखू, सुपारी आणि मावा विक्री करणाऱ्या पानटपऱ्या व दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती करण्यावरही त्यांनी भर दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेताना, नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
या बैठकीला समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा सल्लागार डॉ. मुजाहिद आलासकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. डॉ. आलासकर यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
जिल्हाधिकारी काकडे यांनी स्पष्ट केले की, शालेय परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच पानटपऱ्यांवर बेकायदेशीररित्या विक्री होणाऱ्या सुगंधी तंबाखू आणि माव्यावर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग, विक्री कर विभाग, कामगार कल्याण विभाग आणि आरोग्य विभाग यांनी समन्वयाने कारवाई करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
तंबाखू सेवनामुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे केवळ कारवाईपुरती मर्यादा न ठेवता, नागरिकांमध्ये जनजागृती मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
हेही वाचा: निवडणूक आली की विकासाच्या घोषणा; निवडणुकीनंतर प्रश्न जैसे थे.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









