Sangli Today | मिरज : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत एका सराईत चोरट्यास अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 3 लाख 10 हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अरिहंत जयपाल शेटे (वय 26, रा. एरंडोली, ता. मिरज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो सराईत दुचाकी चोर असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विश्रामबाग परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिस चौकशीत आरोपीने साखर कारखान्याच्या परिसरात तसेच गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेल्या मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून हिरो कंपनीच्या विविध मॉडेलच्या पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, या दुचाकींची एकूण किंमत अंदाजे 3.10 लाख रुपये इतकी आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : सुगंधी तंबाखू, मावा विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणार; जिल्हाधिकारी काकडे यांचे स्पष्ट निर्देश.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










