सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये एक गंभीर घटना घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराच्या आईने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक १६ मधील उमेदवार उमर गवंडी यांच्या आई मुमताज गवंडी यांनी सकाळच्या सुमारास विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
उमेदवारी मागे घेण्यासाठी राजकीय दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. (शिवसेना ठाकरे गट) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत काही काँग्रेस नेत्यांवर तसेच काही इतर घाटंकांनी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले असून, उमेदवारी मागे घेण्यासाठी कोणताही दबाव टाकण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
रुग्णालय परिसरात तणाव
घटनेची माहिती पसरताच शासकीय रुग्णालय परिसरात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. यावेळी दोन गटांमध्ये वादाचा प्रसंग निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती मिळाली.
पोलीस ठाण्यात नोंद नाही
या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याचे समजते. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि वस्तुस्थिती स्पष्ट होणे बाकी आहे.
निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी किंवा आचारसंहिता भंग झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे प्रशासनाकडून यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाची नोंद
ही बातमी कोणत्याही आरोपाची पुष्टी करणारी नसून, निवडणूक काळात घडलेल्या घटनेबाबत विविध पक्षांकडून मांडल्या गेलेल्या भूमिकांवर आधारित आहे. अधिकृत चौकशी, वैद्यकीय अहवाल आणि पोलीस नोंदीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा: शामरावनगर येथे पहिल्या पत्नीच्या नातेवाईकांनी केली घरात घुसून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









