सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात घरात घुसून एका कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित कुटुंबाच्या तक्रारीनुसार सांगली शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुदस्सर सलीम बागवान हे ३ जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास शामरावनगर येथील त्यांच्या घरात कुटुंबीयांसह उपस्थित होते. यावेळी त्यांच्या पहिल्या पत्नीचे काही नातेवाईक त्या ठिकाणी आले.
तक्रारीनुसार, संबंधितांनी घरात आल्यानंतर शिवीगाळ सुरू केली. याबाबत विचारणा केली असता त्यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत मुदस्सर बागवान यांच्यासह त्यांची आई, बहीण, भाऊ आणि दुसरी पत्नी जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ताहेरून अल्फाज बागवान, फिजा जुबेर बागवान, तमन्ना तोहिद बागवान, रेश्मा राजू शेख आणि तोहिद अल्फाज बागवान (सर्व रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) यांच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा: सांगली जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी माहिती अधिकार कायद्यावर तीन दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










