सांगली : सोशल मीडियावरील संभाषणाचे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार सांगलीत उघडकीस आला आहे. या प्रकरणात संशयितही अल्पवयीन असून त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात सुधारित बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शिक्षणासाठी नियमितपणे सांगली शहरात येत होती. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख एका अल्पवयीन मुलाशी झाली होती. ओळखीनंतर काही महिन्यांपासून दोघांमध्ये ऑनलाईन संवाद सुरू होता.
त्यानंतर संशयित मुलाने तिचा दुचाकीवरून पाठलाग करणे, तिला वारंवार भेटण्याचा आग्रह धरणे, तसेच फिरायला येण्यास भाग पाडण्याचे प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी संशयिताने, फिरायला आली नाहीस तर सोशल मीडियावरील संभाषणाचे फोटो व्हायरल करीन, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
यावेळी संशयिताने मुलीचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित अल्पवयीन संशयिताविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










