सांगली : डिजिटल प्रशासनात सांगली जिल्हा परिषदने मोठी झेप घेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात 200 पैकी 195 गुण मिळवत सांगलीने ही कामगिरी केली.
या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा सन्मान करण्यात आला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात हा कार्यक्रम पार पडला.
राज्यातील शासकीय कार्यालयांचे वेबसाइट, ई-ऑफिस, ‘आपले सरकार’ सेवा, AI वापर आणि डिजिटल प्रणाली या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. या सर्व बाबींमध्ये सांगली जिल्हा परिषदने उल्लेखनीय कामगिरी केली.
या उपक्रमांमुळे नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सोप्या पद्धतीने मिळू लागल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा: नागज-भिवघाट रोडवर दाम्पत्यावर हल्ला; मारहाण करून 1.20 लाखांचे दागिने लंपास.
- डिजिटल प्रशासनात सांगली जिल्हा परिषदेची मोठी झेप; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
- कवठेमहांकाळ : नागज-भिवघाट रोडवर दाम्पत्यावर हल्ला; मारहाण करून 1.20 लाखांचे दागिने लंपास
- मिरज: कोयत्याचा धाक; तरुणांकडून दहशत निर्माण करत कॅफेत लूट
- वाळवा: खिशातून रुमाल काढताना अपघात; वाळव्याच्या तरुणाचा मृत्यू
- ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात; फेब्रुवारीचा हफ्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू
- सांगलीत बॅडमिंटन हॉल पुन्हा सुरू; खेळाडूंना दिलासा










