Sangli ZP : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत सांगली जिल्ह्यात गावोगावी जनजागृती मोहिम

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ संदर्भातील कार्यक्रमातील दृश्य | फोटो सौजन्य – सांगली जिल्हा परिषद

सांगली : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील गावांमध्ये विकास व जनसहभागावर आधारित विशेष मोहिम राबवली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या विशेष मोहिमेच्या माध्यमातून ग्रामविकासाला चालना देण्यासाठी प्रशासन थेट गावपातळीवर पोहोचून नागरिकांशी संवाद साधत आहे. गावाचा सर्वांगीण विकास केवळ शासकीय योजनांपुरता मर्यादित न ठेवता ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून साध्य करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

अभियानाची प्रमुख उद्दिष्टे

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या अभियानांतर्गत

  • गावातील पायाभूत सुविधांचा विकास व सुधारणा
  • आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेबाबत जनजागृती
  • शासकीय योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे
  • ‘आमचं गाव, आमचा विकास’ या संकल्पनेतून लोकसहभाग वाढवणे

यावर विशेष भर देण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून विविध गावांमध्ये भेटी देऊन स्थानिक गरजा, समस्या आणि विकासकामांचा आढावा घेतला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. या प्रक्रियेत ग्रामपंचायत प्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा सहभाग नोंदवला जात आहे.

प्रशासन–नागरिक समन्वयावर भर

ग्रामपातळीवरील विकासकामे अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वय निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ म्हणजे काय?

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ ही राज्यस्तरीय संकल्पना असून,

ग्रामपंचायत स्तरावर —

विकासकामांना गती देणे

लोकसहभाग वाढवणे

शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभाविपने करणे या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवले जाते.

हेही वाचा: वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथे बिबट्याचा हल्ला; एक वर्षाच्या कालवडीचा मृत्यू.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा