Sangli ZP–PS Elections 2026 : पारदर्शक निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचे संबंधित यंत्रणांना निर्देश

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक 2026 संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची आढावा बैठक | फोटो : संकलन – Sangli Today

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 शांत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून कामकाज करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी दिले.

आगामी निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवडणूक निरीक्षक स्नेहल भोसले पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी (महसूल) सतीश कदम यांच्यासह विविध नोडल अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तालुकास्तरावरील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी एफएसटी, एसएसटी आणि व्हीएसटी पथकांमार्फत कडक तपासणी करावी, प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी तसेच उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची नियमित व काटेकोर तपासणी करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या प्रचार फलकांची पाहणी करून नियमभंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील प्रचार जाहिराती, पेड न्यूज तसेच फेसबुक, इंस्टाग्रामसह सर्व सोशल मीडियावरील प्रचारावर विशेष देखरेख ठेवण्यावर भर देण्यात आला. प्रचार साहित्यावर मुद्रणालय, प्रकाशक आणि प्रतीसंख्येची माहिती नमूद आहे की नाही, याची तपासणी करण्यास सांगण्यात आले असून प्रचार कालावधी संपल्यानंतर कोणताही नियमभंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले.

दरम्यान, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत ग्रामस्तरावर विविध जनजागृती मोहिमा राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचेही स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मतदान व मतमोजणीदरम्यान कडक बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवावे, शस्त्रे जमा करावीत, स्ट्राँग रूम परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवावी तसेच राज्य सीमेवर होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी सतर्क राहावे, अशा सूचनाही पोलीस प्रशासनास दिल्या.

हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाची भूमिका ठरणार निर्णायक.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा