सांगली : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ प्रभावीपणे राबवण्यासाठी सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा घेतला. अभियानातील कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी तालुका विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांना विविध घटकांवर काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. गुणांकनाच्या निकषांनुसार काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
ग्रामपंचायतींच्या कामगिरीचा थेट परिणाम जिल्ह्याच्या राज्यस्तरीय मूल्यांकनावर होत असल्याने प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेतल्याचे बैठकीतून दिसून आले. कामात कसूर आढळल्यास संबंधितांना नोटीस बजावण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, ‘माझी वसुंधरा 5.0’ अभियानातील कामगिरीबद्दल सांगली जिल्हा परिषदेला यापूर्वी राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून, त्या पार्श्वभूमीवर पंचायतराज अभियानातही उच्च गुणांकन मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा: वाळवा तालुक्यातील देवर्डेत कारची दुचाकीला जोरदार धडक; तिघे गंभीर जखमी.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










