सांगली : जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विशाल सविता तेजराव नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्पर्धांच्या वेळी CEO विशाल नरवाडे यांनी स्वतः मैदानावर उपस्थित राहून सहभागी खेळाडू आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत खेळामधील शिस्त, संघभावना आणि खिलाडूवृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी केवळ विजय-पराजयावर लक्ष केंद्रित न करता खेळातून व्यक्तिमत्त्व विकास घडवावा, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
जिल्हास्तरीय स्पर्धांदरम्यान विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मैदानावर विद्यार्थ्यांचा उत्साह, स्पर्धात्मक भावना आणि खेळाडूवृत्ती पाहायला मिळाली. जिल्हा परिषद सांगलीकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले जात असल्याचे यावरून स्पष्ट झाले.
जिल्हा परिषद सांगली विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी सातत्याने उपक्रम राबवत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच सांगली जिल्हा परिषद प्रशासनाकडून स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
हेही वाचा: विटा पोलिसांची मोठी कारवाई; सराईत दुचाकी चोरट्यांना अटक, चार चोरीचे गुन्हे उघड.
- जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा
- आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर









