सांगली : विटा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन सराईत दुचाकी चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १ लाख ४८ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या अटकेमुळे विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे सुशांत उत्तम सोनवणे (वय २५) आणि शुभम किसन भिसे (वय १९, दोघे रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) अशी आहेत. खानापूर तालुक्यातील माहुली येथून २६ डिसेंबर २०२५ रोजी गणेश पांडुरंग माने यांची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार विटा पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. दरम्यान, विटा–खानापूर रस्त्यावरील शिलंगण मैदान परिसरात दोन तरुण विना-नंबर दुचाकीसह संशयास्पदरीत्या थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी चौकशीत त्यांनी माहुलीसह विटा परिसरातील विविध ठिकाणांहून चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
या कारवाईत पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धनंजय फडतरे, संजय हारुगडे, उत्तम माळी, विलास मोहिते, महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, अभिजित पाटील व अजय पाटील यांच्या पथकाने सहभाग घेतला. विटा पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: सरकारी नोकरी लावण्याचे आमिष; ईश्वरपूरमध्ये 13 लाखांची फसवणूक, हवालदारासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










