सांगली : गरजू व उपेक्षित घटकांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे (भा.प्र.से.) यांनी नुकतीच कुष्ठरोगग्रस्त व्यक्ती वास्तव्यास असलेल्या वसाहतीस तसेच रिचर्डसन रुग्णालयास भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी उपचार सुरू असलेल्या रुग्णांशी तसेच उपचार पूर्ण झालेल्या व्यक्तींशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अनुभव व गरजा जाणून घेतल्या. कुष्ठरोगग्रस्तांना समाजात सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आवश्यक आरोग्यसेवा, पुनर्वसन आणि शासकीय सुविधांची उपलब्धता महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यानंतर विशाल नरवाडे यांनी कुष्ठरोगासाठी विशेष उपचार देण्यात येणाऱ्या रिचर्डसन रुग्णालयास भेट देऊन तेथील उपचारपद्धती, पुनर्वसन उपक्रम आणि रुग्णसेवेची माहिती घेतली. कुष्ठरोग निर्मूलनासाठी कार्यरत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवांचे त्यांनी कौतुक केले.
या पाहणीमुळे कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींमध्ये आधार आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून, गरजू घटकांसाठी संवेदनशील प्रशासनाची भूमिका अधोरेखित झाली आहे.
- Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची दिवाळी गोड! ३०४ तालुक्यांतील दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये थेट खात्यात; राज्य सरकारचा ७,५०० कोटींचा निर्णय, GR जारी
- Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात ‘अर्णब’ चक्रीवादळाचे थैमान; गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार का?
- ST Employee Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! शासनाकडून ₹३९१ कोटींचा निधी मंजूर; खात्यात कधी जमा होणार पगार?
- Gold Price Prediction 2036: येत्या दशकात सोन्याचा भाव कुठे पोहोचेल? जुन्या आकडेवारीवर आधारित गणित काय सांगतय, वाचा सविस्तर
- Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ; खरेदीपूर्वी पाहा सांगली, पुण्यासह PNG चे आजचे दर (२७ ऑक्टोबर २०२६)
- Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढला, पारा ३६ पार; ‘या’ ३ जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा, पाहा आजचा हवामान अंदाज









