सांगली : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला बचत गटांच्या सदस्यांशी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे (भा.प्र.से.) यांनी संवाद साधून मार्गदर्शन केले.
या संवादात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावर, उद्योजकतेकडे वाटचाल, तसेच उत्पादनांची गुणवत्ता व ब्रॅंडिंग यावर भर देण्यात आला. महिला बचत गटांनी केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता स्थानिक संसाधनांच्या आधारे शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण कराव्यात, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
बचत गटांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. महिला बचत गटांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा: पहिली ते दहावीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही ऑनलाईन हजेरी सुरू.
- जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा
- आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर









