सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘Sangli Police’ या दुव्याबाबत ‘सांगली टुडे’ वर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर संबंधित लिंक तातडीने सुधारण्यात आली आहे. यापूर्वी zpsangli.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ‘Important Links’ विभागात देण्यात आलेली ‘Sangli Police’ (sanglipolice.org) लिंक असंबंधित व परदेशी जुगारविषयक संकेतस्थळाकडे वळत होती.
या बाबत निदर्शनास आणून दिल्यानंतर, सदर लिंक आता बदलण्यात आली असून ती अधिकृत https://www.sanglipolice.gov.in/ या सांगली पोलीस प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळाकडे वळवण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे चुकीच्या किंवा असंबंधित संकेतस्थळावर जाण्याचा धोका टळला आहे.
दरम्यान, शासकीय संकेतस्थळांवरील बाह्य लिंक्स नियमितपणे तपासणे व अद्ययावत ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. जुने किंवा कालबाह्य डोमेन अद्याप लिंकमध्ये असल्यास नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता निर्माण होते, असे सायबर सुरक्षा तज्ज्ञ सांगतात.
सदर लिंक दुरुस्त करण्यात आल्याने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब असून भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटी टाळण्यासाठी सर्व शासकीय संकेतस्थळांवरील दुव्यांची वेळोवेळी तांत्रिक तपासणी होणे आवश्यक आहे.
यापूर्वी ‘Sangli Today’ ने जिल्हा परिषद संकेतस्थळावरील चुकीच्या ‘Sangli Police’ लिंकबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









