मिरज : खाजगी फायनान्स कंपनीचे वसूली एजंट असल्याचे भासवून वाहनधारकांना अडवून बळजबरीने पैसे उकळणाऱ्या चौघांच्या टोळीला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. ही घटना सोलापूर–कोल्हापूर महामार्गावरील शंभू हॉटेल परिसरात घडली.
या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून दोन मोटारसायकली व मोबाईल फोन असा सुमारे 2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडता संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










