सांगली : गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, “आमदार जयंत पाटील यांच्यावर पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे. हा प्रकार साधा नाही, तर भाजपकडून आखलेली योजना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पडळकरांना उघडपणे पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.”
राऊत पुढे म्हणाले की, “फडणवीसांनी पडळकरांना अनेकदा समज दिली असेल, पण तरीही जर ते अशा भाषेत बोलत असतील तर यामागे फडणवीसांचा मौन पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नाही.”
राऊत यांनी नारायण राणे यांच्या कुटुंबाचा देखील या वादात उल्लेख केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात राजकारणात एकमेकांचे बाप काढण्याची परंपरा राणेंच्या घरातून सुरू झाली आणि आता त्याचाच वारसा चालवण इतरांकडून सुरू आहे.
जयंत पाटील आणि स्व. राजारामबापू पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यभर संताप व्यक्त होत असून, राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी ताडपत्री अनुदान योजना सुरू – ५०% पर्यंत अनुदान.



