‘शक्तीपीठ महामार्ग’ पुन्हा वादात; 19 गावांवर परिणामाचा दावा, 23 फेब्रुवारीला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
शक्तीपीठ महामार्गाविरोधात 23 फेब्रुवारीला बुधगाव ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा; शक्तीपीठ विरोधी कृती समितीचा निर्णय. | प्रतिनिधिक छायाचित्र

सांगली : नागपूर-गोवा (पवनार-पत्रादेवी) शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यावरून सांगली जिल्ह्यातील वाद पुन्हा तीव्र झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही भागात अलाइनमेंट बदलण्याचे संकेत दिल्यानंतरही शेतकरी संघटनांनी संपूर्ण प्रकल्प रद्द करण्याची मागणी कायम ठेवली आहे.

शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या बैठकीत 23 फेब्रुवारी रोजी बुधगाव येथून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीचे उमेश देशमुख म्हणाले, प्रस्तावित महामार्गामुळे जिल्ह्यातील सुमारे 19 गावांवर परिणाम होणार आहे.

नवीन आराखड्यानुसार प्रस्तावित महामार्ग सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव आणि वाळवा तालुक्यांमधून जाणार असल्याचे विरोधी समितीचे देशमुख यांनी सांगितले. सरकारने अलाइनमेंट बदलली तरी सिंचन क्षेत्र, शेती आणि पूरस्थितीचा धोका कायम राहील, असा दावा समितीने केला आहे.

दरम्यान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी मूळ आराखड्यानुसार महामार्ग उभारण्याच्या समर्थनार्थ सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत बैठका घेण्याची घोषणा केली आहे.

शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात समर्थन आणि विरोध असे दोन स्पष्ट गट समोर येत असून, येत्या काही दिवसांत वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा: दरवाजा निघाला अन् जीप शेतात पलटी; नांद्रे-सांगली मार्गावर अपघात सात जखमी, चालकावर गुन्हा दाखल.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा