सांगली : नांद्रे-सांगली मार्गावरील नावरसवाडी नवीन पुलाजवळ वडाप जीप पलटी होऊन सात जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. चालकाच्या बाजूचा दरवाजा अचानक निघाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप थेट शेतात जाऊन उलटली, अशी प्राथमिक माहिती आहे.
जखमींमध्ये जास्मीन महंमदशरीफ अथणीकर (मिरज), नीशा अशरफ राजपूर (निगडी), सुषमा बाळू कांबळे (ता. तासगाव), हनिफा युनुस बागवान (नांद्रे), संजय संतोष भोरे (रा. कर्जत, रायगड) यांचा समावेश असून इतर काही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वडाप चालक तेजस मारुती लोखंडे (माधवनगर) हा जीप (एमएचके 0513) घेऊन नांद्रेहून सांगलीकडे येत असताना नवीन पुलाजवळील वळणावर अपघात झाला. जीप शेतात पलटी झाल्याने मोठी जीवितहानी टळली.
या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: ‘माझी वसुंधरा ५.०’मध्ये सांगलीची हॅट्रिक; मिळवले 10.75 कोटींचे बक्षीस.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










