सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व अचूकपणे पार पाडण्यासाठी मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे सविस्तर ईव्हीएम प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण २४ आणि २५ डिसेंबर रोजी सांगली येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे पार पडले.
महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेच्या हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये यंत्रणेची जोडणी, सीलिंग प्रक्रिया, मॉक पोल, प्रत्यक्ष मतदानाची कार्यपद्धती तसेच मतमोजणीपूर्व पडताळणी प्रक्रियेचा समावेश होता.
प्रशिक्षणादरम्यान मतदानाच्या दिवशी उद्भवू शकणाऱ्या संभाव्य तांत्रिक अडचणी आणि त्यावर घ्यावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यासोबतच सादरीकरणाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतील नियम, जबाबदाऱ्या आणि दक्षता याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
दोन दिवसांत सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांमध्ये हे प्रशिक्षण राबविण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने मतदान अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. प्रशिक्षण अधिक प्रभावी होण्यासाठी पदनिहाय विभागणी करण्यात आली होती. मतदान केंद्राध्यक्षांना मतदान केंद्राचे संपूर्ण नियंत्रण व व्यवस्थापन, तर मतदान अधिकाऱ्यांना मतदार ओळख, नोंदवही हाताळणी, शाई लावणे आणि तांत्रिक सहाय्य याबाबत स्वतंत्र मार्गदर्शन देण्यात आले.
महानगरपालिका प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी सुरू असून, आगामी टप्प्यांमध्येही अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: डिजिटल व्यवहार करताना सतर्कता आवश्यक – राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सांगलीत कार्यशाळा.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









