सांगली : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात सार्वजनिक ठिकाणी भित्तिपत्रके चिकटवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील क्रांती क्लिनिकजवळ असलेल्या महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीवर विविध मजकूर असलेली भित्तिपत्रके चिकटवण्यात आल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले. माहिती मिळताच महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
भित्तिपत्रकांवर वेगवेगळा मजकूर आढळून आला असून, तो सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याचे चित्रीकरण करून फलक काढून टाकण्यात आले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाच्या तक्रारीनुसार, निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेचा तपास करण्यासाठी शहर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संबंधित व्यक्तींचा शोध सुरू आहे.
हेही वाचा: महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम प्रशिक्षण पूर्ण.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










