तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात. (फाईल फोटो)

मिरज : कुपवाड-तानंगहून मिरजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अचानक वळण घेतलेल्या मालवाहू टेम्पोला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्यानंतर दुचाकीस्वार समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोखाली सापडल्याने ही दुर्घटना घडली.

राजेश शिवलिंग पाटील (वय 35, रा. महादेव मंदिरामागे, बेडग ता. मिरज) असे जखमीचे नाव आहे. सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास ते एमएच 10 सीई 8104 क्रमांकाच्या दुचाकीवरून तानंग मार्गे बेडगकडे जात होते.

तासगाव फाट्याजवळ छोट्या टेम्पोने (एमएच 11 सीएच 3552) अचानक वळण घेतल्याने पाटील यांच्या दुचाकीची टेम्पोच्या मागील बाजूस धडक बसली. धडकेनंतर पाटील रस्त्यावर कोसळले आणि समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच 09 जीएच 1566) खाली सापडले. टेम्पो चालकाने ब्रेक लावूपर्यंत ते रस्त्यावर काही अंतर फरफटत गेल्याने पाटील गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी आयशर टेम्पो चालक भारत लक्ष्मण माने (वय 39, रा. बेडग ता. मिरज) याच्याविरुद्ध कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा