आता एजंटशिवाय घरबसल्या काढा तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र; ‘आपले सरकार’ने जाहीर केली कागदपत्रांची यादी आणि १५ दिवसांची मुदत

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र आता एजंटशिवाय घरबसल्या ऑनलाइन काढता येणार असून, अर्ज केल्यानंतर १५ दिवसांत प्रमाणपत्र मिळू शकते. (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई / सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): शैक्षणिक प्रवेश, शासकीय भरती प्रक्रिया, निमशासकीय कामे आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक असते. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता नागरिकांना कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाकडे जाण्याची गरज नसून, महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ (Aaple Sarkar) या अधिकृत ऑनलाइन सेवा पोर्टलवरून घरबसल्या अर्ज करता येणार आहे. शासनाने या सेवेसाठी आवश्यक कागदपत्रांची स्पष्ट यादी जाहीर केली असून, अर्ज केल्यापासून अवघ्या १५ दिवसांत हे प्रमाणपत्र देण्याची कालमर्यादा निश्चित केली आहे.

या प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करताना अर्जदाराकडे ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रोजगार हमी जॉब कार्ड, निमशासकीय ओळखपत्र किंवा वाहनचालक परवाना यांपैकी कोणतेही एक कागदपत्र असणे अनिवार्य आहे. तसेच सध्याच्या पत्त्याचा पुरावा सिद्ध करण्यासाठी वीज बिल, भाडेपावती, शिधापत्रिका, दूरध्वनी देयक, पाणीपट्टी पावती, मालमत्ता करपावती किंवा सातबारा व ८ अ उतारा यांपैकी एक दस्तऐवज जोडावा लागणार आहे.

याशिवाय वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र यांपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र सादर करावे लागेल. महाराष्ट्रातील किमान १५ वर्षांपासूनचे वास्तव्य सिद्ध करण्यासाठी सातबारा व ८ अ उतारा, वीज देयक, भाडेपावती, मतदार यादीचा उतारा, शिधापत्रिका, मालमत्ता करपावती किंवा वडील अथवा पतीचे अधिवास प्रमाणपत्र यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.

संबंधित सर्व मूळ कागदपत्रे स्कॅन करून ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर अपलोड केल्यानंतर महसूल विभागाकडून पडताळणी केली जाते आणि १५ दिवसांच्या विहित मुदतीत डिजिटल स्वाक्षरीयुक्त तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र नागरिकांना उपलब्ध करून दिले जाते. या पारदर्शक सुविधेमुळे सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.

हेही वाचा: दिवाळीत एसटीच्या लालपरीला प्रवाशांची विक्रमी पसंती; अवघ्या १६ दिवसांत तब्बल ५४८ कोटींचे उत्पन्न जमा.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा