एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना; १ जानेवारी २०२७ पासून नवे नियम लागू, ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ — अशी करा नोंदणी

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना; 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, १ जानेवारी २०२७ पासून नवे नियम लागू. (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई / सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एसटी प्रवासातील विविध सामाजिक सवलतींचा लाभ अधिक पारदर्शक व सुलभ व्हावा यासाठी महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली सुरू केली असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हे कार्ड काढण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

आतापर्यंत राज्यभरात सुमारे १ कोटी १० लाख प्रवाशांनी या स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांची नोंदणी अद्याप प्रलंबित असल्याने परिवहन विभागाने हा दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत प्रवासी आपले मूळ ओळखपत्र दाखवून पूर्वीप्रमाणेच सवलतीच्या दरात प्रवास करू शकतात; मात्र १ जानेवारी २०२७ पासून सर्व प्रवास सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.

ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे 

राज्यातील सर्व पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ३१ डिसेंबरपूर्वी हे कार्ड पोहोचविण्यासाठी आता ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. तसेच राज्यातील सर्व एसटी बस स्थानके, आगार आणि ३ हजारांहून अधिक अधिकृत नोंदणी केंद्रांवरही नावनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोणाला किती सवलत मिळणार? 

आधार क्रमांकाशी जोडलेल्या या स्मार्ट कार्डद्वारे ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत महिला प्रवाशांना तिकीट दरात ५० टक्के सवलत कायम राहणार आहे. तसेच ६५ ते ७४ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना ‘सरल’ (SARAL) क्रमांकाद्वारे आणि दिव्यांग प्रवाशांना यूडीआयडी (UDID) कार्डद्वारे सवलत दिली जाईल. (पूर्ण तिकीट काढणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी हे कार्ड सक्तीचे नाही.)

हेही वाचा: लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर हप्त्याबाबत मोठी अपडेट; महिलांची केंद्रांवर गर्दी, प्रशासनाने स्पष्ट केली वस्तुस्थिती.

नोंदणी प्रक्रिया, कागदपत्रे आणि शुल्क 

सवलतीच्या प्रवासासाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज उपलब्ध नसून, केवायसी (KYC) आणि आधार पडताळणीसाठी प्रवाशांनी जवळच्या एसटी डेपोत किंवा अधिकृत केंद्रावर जाणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी मूळ आधार कार्ड आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक सोबत ठेवावा. नवीन कार्डसाठी १९९ रुपये (जीएसटीसह) नोंदणी शुल्क आकारले जाते, तर जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत नवीन कार्ड उपलब्ध होते. नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या पावतीवरील क्यूआर (QR) कोडद्वारे पुढील ३० दिवस सवलतीचे तिकीट काढता येते आणि महिन्याभरात प्रत्यक्ष कार्ड हातात मिळते.

हेही वाचा: जत तालुक्यातील पाणी आणि चाऱ्याच्या प्रश्नावर प्रशासन ॲक्शन मोडवर; जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, खासदार विशाल पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांची भिवर्गीत आढावा बैठक.

Ncmc Card रिचार्ज आणि वापरण्याची सोपी पद्धत 

या ‘वन नेशन, वन कार्ड’ प्रीपेड स्मार्ट कार्डमध्ये किमान १०० रुपये ते कमाल २,००० रुपयांपर्यंत रक्कम ठेवता येते. प्रवासी Google Pay, PhonePe यांसारख्या UPI ॲपवरून किंवा प्रवासादरम्यान बस वाहकाकडील (कंडक्टर) ईटीआयएम मशीनवरून रोख रक्कम देऊन कार्ड रिचार्ज करू शकतात आणि तिकिटावर शिल्लक रक्कम तपासू शकतात. एसटी बससोबतच मुंबई-पुणे मेट्रो आणि बेस्ट बसेसमध्येही हेच कार्ड वापरता येईल.

हेही वाचा: प्रलंबित पीक विमा आणि १६ जिल्ह्यांच्या यादीबाबत शासनाचे मोठे स्पष्टीकरण; रब्बी हंगामासाठी ७ पिकांची नोंदणी सुरू.

📢 लाडकी बहीण योजनेसह महाराष्ट्रातील ईतर शासकीय योजना, नवीन शासन निर्णय (GR), आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा