जत तालुक्यातील पाणी आणि चाऱ्याच्या प्रश्नावर प्रशासन ॲक्शन मोडवर; जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, खासदार विशाल पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांची भिवर्गीत आढावा बैठक

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
जत तालुक्यातील पाणी व चाऱ्याच्या प्रश्नावर भिवर्गी येथील श्री बिळेणसिद्ध मंदिर प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत आयोजित आढावा बैठक.

जत / सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): जत तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार, १८ नोव्हेंबर) सकाळी भिवर्गी येथील श्री बिळेणसिद्ध मंदिराच्या प्रांगणात संख अप्पर तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावांची महत्त्वपूर्ण प्रशासकीय आढावा बैठक पार पडली.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून जनावरांच्या चाऱ्याचीही मोठी अडचण जाणवत आहे. या सर्व समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आढावा बैठक घेण्यात आली.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: प्रलंबित पीक विमा आणि १६ जिल्ह्यांच्या यादीबाबत शासनाचे मोठे स्पष्टीकरण; रब्बी हंगामासाठी ७ पिकांची नोंदणी सुरू.

या बैठकीस जिल्हा व तालुक्यातील सर्व विभागांचे खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. संख मंडळातील विविध गावांचे सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच नागरिकांनी आपल्या गावातील पाणी, चारा आणि इतर मूलभूत अडचणी थेट प्रशासनासमोर मांडल्या. नागरिकांच्या या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

भिवर्गी येथील ही बैठक पूर्ण झाल्यानंतर जत तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावांसाठी जत येथील श्री यल्लाम्मा देवी मंदिराच्या प्रांगणात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जत मंडळातील सर्व सरपंच, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आपल्या गावातील अडचणी मांडण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम; औषध दुकानांची तपासणी आणि अवैध लागवडीचे डिजिटल सर्वेक्षण होणार.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा