सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; ७४ टँकरद्वारे ६६ गावे आणि ४७९ वाड्यांतील १.४३ लाख नागरिकांना पाणीपुरवठा सुरू

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली जिल्ह्यातील ६६ गावांमधील १.४३ लाखांहून अधिक नागरिकांना ७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू; जत तालुक्यात पाणीटंचाईची सर्वाधिक झळ. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात पाणीटंचाईची झळ तीव्र होऊ लागली असून, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत टँकर आणि विहीर अधिग्रहणाच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत. जिल्हा परिषदेच्या १७ नोव्हेंबर अखेरच्या अधिकृत अहवालानुसार जिल्ह्यात ६६ खासगी आणि ८ शासकीय अशा एकूण ७४ टँकरद्वारे ६६ गावे व ४७९ वाड्यांतील १ लाख ४३ हजार ८८८ नागरिकांना आणि ९७ हजार ४३४ पशुधनाला पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. तसेच टंचाई निवारणासाठी ३० खासगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईची झळ जत तालुक्याला बसली असून, येथील ५७ गावे व ४१४ वाड्यांमधील सुमारे १ लाख २४ हजार ८६७ नागरिक आणि ८१ हजार २२२ पशुधनाला ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये ५७ खासगी व ७ शासकीय टँकरचा समावेश असून, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात १८ खासगी विहिरी व बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत, तर ४ डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आली आहेत.

हेही वाचा: सांगली जिल्हा बँक अध्यक्षपदी काँग्रेसचे महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड; निवड प्रक्रियेला आमदार गोपीचंद पडळकर गैरहजर.

आटपाडी तालुक्यातील ७ टंचाईग्रस्त गावे व ५१ वाड्यांमधील १६ हजार ३३२ नागरिकांना आणि १६ हजार २१२ पशुधनाला ८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून येथे ४ विहिरी व बोअर अधिग्रहित केले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील १ गाव व ८ वाड्यांमधील १ हजार ८३४ नागरिकांसाठी १ शासकीय टँकर सुरू करण्यात आला असून २ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

तासगाव तालुक्यातील १ गाव व ६ वाड्यांमधील ८५५ नागरिकांना १ खासगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात असून येथे ३ विहिरी व बोअर अधिग्रहित केले आहेत. याशिवाय खानापूर तालुक्यातील २ गावे टंचाईग्रस्त असून तेथील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ३ खासगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.

हेही वाचा: शासकीय नोकरीतील आरक्षणासाठी महत्त्वाचे ‘प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र’ काढा आता घरबसल्या; कोणती कागदपत्रे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा