सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम; औषध दुकानांची तपासणी आणि अवैध लागवडीचे डिजिटल सर्वेक्षण होणार

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र २०२९ अभियानाच्या अंमलबजावणीसाठी सांगलीत जिल्हास्तरीय NCORD समितीची आढावा बैठक; जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश.

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करून राज्य अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शासनाने ‘अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र २०२९’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या (NCORD) आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत आणि पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: सोलापूर-मिरज एक्सप्रेसचा विस्तार सांगली रेल्वे स्थानकापर्यंत करा; सांगलीतील प्रवाशांची मध्य रेल्वेकडे जोरदार मागणी.

या बैठकीत ‘अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र २०२९’ या अभियानांतर्गत १२ शासकीय विभाग, ४० मूल्यांकन निकष आणि एकूण ६५० गुणांच्या गुणांकन पद्धतीचे सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील अमली पदार्थांची अवैध लागवड, निर्मिती, साठवणूक, वाहतूक आणि विक्री रोखण्यासोबतच व्यसनाधीन व्यक्तींचे समुपदेशन, उपचार व पुनर्वसन करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील औषध विक्री केंद्रांची तपासणी करून तेथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करावी, तसेच रासायनिक घटकांची वाहतूक व साठवणुकीवर उद्योग विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमित तपासणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक तालुक्यात व्यसनमुक्ती उपचार सुविधा निर्माण करून ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये अंमली पदार्थविरोधी शपथ देण्यात यावी आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी, असे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सांगितले. महसूल, वन व कृषी विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने जिल्ह्यातील अवैध लागवडीच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी व डिजिटल सर्वेक्षण करावे. दरम्यान, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, गुन्ह्यांच्या प्रमाणानुसार सांगली जिल्ह्याचा समावेश मध्यम गुन्हेप्रमाण असलेल्या गट ‘ब’ मध्ये करण्यात आला असून १ नोव्हेंबर २०२६ ते ३० एप्रिल २०२७ या कालावधीत हे अभियान राबवले जाणार आहे.

हेही वाचा: आता एजंटशिवाय घरबसल्या काढा ड्रायव्हिंग लायसन्स; ‘आपले सरकार’ने जाहीर केले अधिकृत दर आणि कागदपत्रांची यादी.

बैठकीत सादर झालेल्या आकडेवारीनुसार, सन २०२६ मध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत जिल्ह्यात एकूण १६२ गुन्हे दाखल करून १९२ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे, तर अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरोधात १३३ गुन्हे दाखल करून १५९ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय नशामुक्त भारत अभियान (NMBA) व मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजनेच्या सहाव्या वर्षपूर्तीनिमित्त येत्या २६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्याबाबतही यावेळी सविस्तर नियोजन करण्यात आले.

हेही वाचा: दिवाळीत एसटीच्या लालपरीला प्रवाशांची विक्रमी पसंती; अवघ्या १६ दिवसांत तब्बल ५४८ कोटींचे उत्पन्न जमा.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा