सांगलीत विश्रामबाग आणि विष्णुघाट परिसरात बंद फ्लॅट फोडून सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगलीतील दोन अपार्टमेंटमधील तीन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली शहरातील विष्णुघाट आणि विश्रामबाग परिसरात घरफोडीच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या असून, अज्ञात चोरट्यांनी दोन अपार्टमेंट्समधील तीन बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ९४ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सांगली शहर आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

पहिली चोरीची घटना विष्णुघाट पोलिस चौकीच्या नजीक असलेल्या गिरिजा अपार्टमेंटमध्ये १४ नोव्हेंबर रोजी घडली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ११ मध्ये राहणारे संदीप विष्णू यमगर (वय ४२) हे कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी साधत चोरट्याने सकाळी नऊ ते दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून चांदीचे पैंजण, कानातील रिंगा, करदोडा आणि पाच हजार रुपये रोख असा एकूण १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला. या प्रकरणी संदीप यमगर यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

दुसरी घटना विश्रामबाग हद्दीतील हसनी आश्रम मुख्य रस्त्यावरील गव्हर्न्मेंट कॉलनीतील साईविश्वास अपार्टमेंटमध्ये १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ ते रात्री सव्वानऊच्या दरम्यान घडली. येथील फ्लॅट क्रमांक ३०१ मधील रहिवासी गौरव मंगेश जप्तीवाले (वय ३८) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने ३५ ग्रॅमचे मणीमंगळसूत्र, १० ग्रॅमचा नेकलेस, कर्णफुले, वेढण, चांदीची नाणी आणि ३८ हजार रुपये रोकड असा १ लाख ६५ हजार ८५० रुपयांचा ऐवज लंपास केला.

याच इमारतीतील फ्लॅट क्रमांक २०१ मध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक दामोदर विठ्ठलराव मुधाळे (वय ७१) यांचेही घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आठ ग्रॅम वजनाची दोन मणीमंगळसूत्रे, नऊ ग्रॅम सोन्याची पाने, १० ग्रॅमचा नेकलेस, नऊ ग्रॅमची चेन, कर्णफुले, चांदीची चेन, पूजेचे साहित्य आणि २५ हजार रुपये रोख रक्कम असा १ लाख १५ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. विश्रामबाग पोलिस ठाण्यात या घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला जात आहे.

हेही वाचा: वीजबिलापासून सुटका; दरमहा ३०० युनिट मोफत वीज आणि ‘पीएम सूर्य घर’ योजनेतून ७८ हजारांपर्यंत अनुदान.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा