तासगावच्या कवठेएकंदमध्ये मध्यरात्री थरार; गॅस कटरच्या सहाय्याने एसबीआयचे एटीएम फोडून पाच लाखांची रोकड लंपास

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
कवठेएकंदमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; गॅस कटरने SBI चे एटीएम फोडून सुमारे ५ लाखांची रोकड लंपास. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील वर्दळीच्या एसटी स्टँड परिसरात असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी लक्ष्य केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

अज्ञात चोरट्यांनी गॅस कटर आणि इतर हत्यारांचा वापर करून एटीएम मशीन कापले आणि त्यातील सुमारे पाच लाख रुपयांची रोकड लंपास केली. बुधवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला असून, गुरुवारी दुपारी ही चोरी उघडकीस आली.

हेही वाचा: सांगली जिल्हा बँक आवारात तणाव; अध्यक्ष महेंद्र लाड यांच्या पुत्राची पत्रकारांशी हुज्जत, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

कवठेएकंद एसटी स्टँड परिसरात नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच या एटीएम सेंटरचे शटर खाली ओढलेले होते. शटर बंद असल्यामुळे नेमके काय घडले आहे, याचा कोणालाही अंदाज आला नाही.

अखेर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक ग्राहक पैसे काढण्यासाठी तिथे आला असता, शटर उघडल्यानंतर एटीएमची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने तासगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून तासगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच तज्ज्ञ पथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले.

घटनास्थळावरून बोटांचे ठसे व इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा माग काढत आहेत. रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा: सांगलीतील कोल्हापूर रस्त्यावर भीषण अपघात; रक्षाविसर्जनासाठी निघालेल्या दुचाकीस्वाराला भरधाव गाडीची धडक, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर.

📢 सांगली जिल्ह्यातील अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा