सांगली : तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा अधिक प्रभावीपणे वापरावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण सुनिश्चित करण्यासाठी केंद्र शासनाने तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम 2019 व नियम 2020 लागू केले आहेत. या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी नॅशनल हेल्पलाईन क्रमांक 14427 कार्यान्वित असून, तक्रार नोंदवणे, मार्गदर्शन व मदत मिळवण्यासाठी ही सेवा वापरता येते.
यासोबतच, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून (National Portal for Transgender Person) https://transgender.dosje.gov.in/ हे स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
तृतीयपंथीय समुदायाने त्यांच्या हक्कांबाबतची माहिती मिळवण्यासाठी तसेच समस्या मांडण्यासाठी अधिकृत हेल्पलाईन आणि पोर्टलचा वापर करावा, असे आवाहनात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा: वाढते अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा ही सामाजिक चळवळ व्हावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे.
- जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा
- आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर









