Sangli Crime News : सांगली जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना; शहरात जुन्या वादातून हत्या, तर जतमध्ये संशयास्पद मृत्यू

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
सांगली जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना उघडकीस; शहरात जुन्या वादातून हत्या, जतमध्ये संशयास्पद मृत्यू – प्रातिनिधिक छायाचित्र

Sangli News : सांगली जिल्ह्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या गंभीर घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सांगली शहर आणि जत तालुक्यात खुनाच्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सांगली शहरातील माधवनगर अहिल्यानगर रोड परिसरात राहुल कदम या तरुणाची जुन्या वादातून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आपसी वादातून हा प्रकार घडल्याचा संशय असून, घटनेनंतर संबंधित संशयितांनी स्वतःहून संजयनगर पोलीस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांकडून सध्या त्यांची कसून चौकशी सुरू असून, हत्येच्या पार्श्वभूमीचा तपशीलवार तपास केला जात आहे.

दरम्यान, जत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील जनावर अड्ड्याजवळ एका व्यक्तीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला. मृत व्यक्तीची ओळख विकास टकले (रा. कारंडेवाडी उर्फ घुळेवाडी, ता. जत) अशी पटली आहे. या मृत्यूमागे हत्या, मारहाण किंवा अन्य कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या दोन्ही घटनांमुळे सांगली शहरासह जत तालुक्यातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: महायुती एकत्र निवडणूक लढवणार; महापौर भाजपचाच होणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा