सांगली : विश्रामबाग रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तेजस मारुती सुपे (वय २०, रा. वाढा, ता. खेड, जि. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
तेजस हा सांगलीतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग रेल्वे स्थानकाजवळ तो रेल्वे रुळांजवळ असताना रेल्वेची धडक बसल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपासणीदरम्यान तेजस याचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या मदतकार्यात स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, सागर जाधव, आशिष सावंत, अमीर नदाफ, शिवराज टाकळी आदी सदस्य सहभागी झाले होते. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत संजयनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सांगली महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना ब्रेक.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









