सांगली : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतत मारामाऱ्या, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, शिवीगाळ आणि गोंधळ निर्माण करणे अशा वारंवार गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या प्रशांत दिलीप चौगुले (वय 26, रा. इंदिरानगर झोपडपट्टी) या तरुणाला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
महानगरपालिका निवडणुका जवळ आल्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, शांतता राखली जावी आणि गुन्हेगारीवर प्रतिबंध ठेवण्यासाठी पोलिसांनी ही निर्णायक कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. अंतिम आदेशानुसार, चौगुले याला एक वर्षासाठी जिल्ह्याच्या सीमा सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांच्या पथकाने ही कारवाई अंमलात आणली. चौगुले याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे नोंद असून, कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा: बांबवडे येथे दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; अज्ञात चालकाविरोधात पलूस पोलिसांत गुन्हा दाखल.
🔴 ताज्या बातम्या 🔴
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










