Sangli Accident: बांबवडे येथे दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; अज्ञात चालकाविरोधात पलूस पोलिसांत गुन्हा दाखल

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Elderly man dies in bike accident in Bambawade Sangli (सांगली टुडे फोटो)

पलूस : कराड–तासगाव रोडवरील बांबवडे परिसरात घडलेल्या अपघातात 71 वर्षीय सर्जेराव आनंदा जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

9 डिसेंबर रोजी सायंकाळी अंदाजे 6.30 वाजता, संतोष पोल्ट्री फॉर्मजवळ ही दुर्घटना घडली. काळ्या रंगाच्या दुचाकी चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत पादचारी जाधव यांना धडक दिली.

घटनेनंतर मृताचा मुलगा संग्राम सर्जेराव जाधव (वय 22) यांनी पलूस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांना सदर घटणेबाबत काही माहिती असल्यास त्यांनी पुढे येऊन माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: नोकरीच्या आमिषाने तरुणाला 18 लाखांचा गंडा; वाळव्यातील व्यक्तीवर गुन्हा दाखल.

TAGGED:
Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा