सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची दाट शक्यता असून, प्रशासनाने निवडणुकीसाठीची युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. संपूर्ण महापालिका हद्दीत 568 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, यापैकी 540 केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे.
निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे दस्तऐवज लवकरच जाहीर होणार आहेत. अंतिम मतदार याद्या 15 डिसेंबरला, तर मतदान केंद्रांची अंतिम यादी 20 डिसेंबरला प्रकाशित केली जाईल. मतमोजणी आणि स्ट्राँग रूमची व्यवस्था मिरजेतील शासकीय गोदामात करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त सत्यम गांधी हे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असून, त्यांच्या सहकार्याकरिता सात निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मतदारसंख्येनुसार 1,250 ईव्हीएम मशीनची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, 19 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोग महापालिका अधिकाऱ्यांना मुंबईत निवडणूक साहित्य वाटपासाठी पाचारण करणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तारखेची घोषणा आता केवळ औपचारिकता असल्याचे संकेत प्रशासनातील सूत्रांकडून मिळत आहेत.
हेही वाचा: वारंवार गुन्ह्यांमध्ये सहभागी 26 वर्षीय तरुणाला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार.
🔴 सांगलीतील आजच्या ताज्या बातम्या 🔴
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










