सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया वेग घेत असून, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 13 आणि 14 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. या मुलाखती पाटीदार भवन, कॉलेज कॉर्नर रोड येथे आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली.
भाजपच्या या उमेदवार निवड प्रक्रियेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन असणार आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांनुसार उमेदवारांची छाननी केली जाणार आहे.
मुलाखत समितीत आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचा समावेश आहे.
कार्यक्रमानुसार, प्रभाग क्रमांक 1 ते 8 मधील इच्छुकांच्या मुलाखती 13 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता होणार आहेत. तर प्रभाग क्रमांक 9 ते 20 मधील इच्छुकांसाठी मुलाखती 14 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता सुरू होतील.
सर्व इच्छुक उमेदवारांनी ठरलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकाश ढंग यांनी केले आहे. उमेदवार निवडीत पक्ष संघटना, स्थानिक परिस्थिती आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता या मुद्द्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा: सांगली महापालिका निवडणूक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता.
🔴 सांगलीतील ताज्या बातम्या 🔴
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










