सांगली : सांगली शहरात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, तिच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्कार तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित चव्हाण (रा. समतानगर, वेअरहाऊसजवळ, गल्ली क्रमांक 9, मिरज) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी सांगली शहरातील एका भागात वास्तव्यास असून तिची आरोपीशी ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लग्नाचे आमिष दाखवले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मार्च 2025 मध्ये आरोपीने तिला शहरातील एका उपनगरात स्वतंत्र खोलीत ठेवले. त्या ठिकाणी डिसेंबर 2025 पर्यंत तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.
पीडितेने रोहित चव्हाण याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा: मोटारसायकल चोरांची जोडी जेरबंद; चार दुचाकी जप्त, कर्नाटकातूनही वाहनचोरीची कबुली.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










