सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, सोमवार दि. 15 रोजी सांगली दौऱ्यावर येत असून, शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असतानाच हा कार्यक्रम होत असल्याने त्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार, खासदार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, भाजपकडून या कार्यक्रमाला विशेष महत्त्व दिले जात असून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरभर स्वागत फलक, बॅनर झळकत असून भाजपच्या संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे नेते शेखर इनामदार, पृथ्वीराज पाटील, नीता केळकर, पृथ्वीराज पवार, जयश्री पाटील शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते दौऱ्याच्या तयारीत व्यस्त आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात असून, याच निमित्ताने निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणुकीसाठी पक्षाकडून ताकद दाखवण्याची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा: मिरजेत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










