मुंबई : राज्यातील प्रलंबित महानगरपालिका निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता असून, राज्य निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात आज महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत महापालिका निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास तत्काळ राज्यभर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, त्यामुळे राजकीय हालचालींना अधिक वेग येणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील सुमारे 28 महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाने आवश्यक तयारी पूर्ण केली असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मतदान 12 जानेवारीनंतर होण्याची शक्यता असून, त्यानंतर अल्पावधीतच मतमोजणी व निकाल जाहीर होऊ शकतात. आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वच राजकीय पक्षांचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: अहिल्यादेवींच्या पुतळा लोकार्पणानिमित्त भाजपचे शक्तिप्रदर्शन, महापालिका निवडणुकीची नांदी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










