मिरज : शहरातील रमा उद्यान परिसरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या गळ्यातील दागिने ओढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्याने सुमारे 98 हजार रुपये किमतीचा दागिन्याचा तुटलेला भाग लंपास केला असून, याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय भार्गव मेस्त्री यांच्या आई शनिवार, दि. 13 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास रमा उद्यान परिसरात घराजवळ थांबल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका संशयित व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधत, “माझ्या मित्राचे घर इथेच आहे, पत्ता सांगाल का?” अशी विचारणा केली.
महिलेचे लक्ष विचलित झाल्याची संधी साधून संबंधित चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने प्रतिकार करत दागिन्याचा काही भाग हातात धरून ठेवला. मात्र, चोरट्याने तुटलेला भाग घेऊन दुचाकीवरून घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी अशा प्रकारांबाबत सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास मिरज शहर पोलिस करत आहेत.
हेही वाचा: मंत्रिमंडळ बैठकीनंतर महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचे संकेत.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










