Sangli Municipal Election: सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Sangli Miraj Kupwad Municipal Election Schedule 2026 (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. या घोषणेसोबतच सांगली जिल्ह्यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

महानगरपालिका निवडणुकीसाठी सांगली-मिरज-कुपवाड क्षेत्रात प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात असून मतदान केंद्रे, कर्मचारी नियुक्ती आणि सुरक्षेचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. शहरातील सर्व प्रभागांमध्ये ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 23 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत होणार आहे. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी, 2 जानेवारीला उमेदवारी माघार, तर 3 जानेवारी 2026 रोजी अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हे जाहीर केली जाणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, 1 जुलै 2025 रोजी अधिसूचित करण्यात आलेली मतदार यादीच सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असून कोणतेही नाव नव्याने समाविष्ट करण्याचा किंवा वगळण्याचा अधिकार आयोगाकडे नाही.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली-मिरज-कुपवाडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांकडून उमेदवार निवड, सर्वेक्षण आणि संघटनात्मक बैठका सुरू झाल्या आहेत. निवडणूक जाहीर होताच प्रचाराची रणधुमाळी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा