Sangli Agriculture News : हळदीच्या वायदेबाजारातील गैरव्यवहाराची CBI चौकशी करा; राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Sangli Turmeric Futures Market Scam Cbi Probe Demand Raju Shetti | (फोटो : सांगली टुडे)

Sangli News | सांगली : हळदीच्या वायदेबाजाराच्या माध्यमातून मुठभर व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचा गंभीर आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत वायदेबाजाराचा गैरवापर करून हळदीचे दर कृत्रिमरित्या पाडले गेले, ज्यामुळे देशभरातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे २५ हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सांगलीसह हळद उत्पादक जिल्हे सर्वाधिक प्रभावित

राज्यात सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी, चंद्रपूर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि वाशिम हे हळद उत्पादनाचे प्रमुख जिल्हे आहेत. देशात सर्वाधिक हळद उत्पादन करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख असून, राज्यात दरवर्षी सुमारे ३ ते ३.५ लाख टन हळदीचे उत्पादन होते. यावर्षी उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता असताना, बाजारात भाव वाढण्याऐवजी वायदेबाजारात दर पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

स्थानिक बाजार व वायदेबाजारातील दरांमध्ये तफावत

राजू शेट्टी यांनी नमूद केले की,
स्थानिक बाजारात हळदीचे दर चांगले असतानाही NCDEX वरील वायदेबाजारात कृत्रिमरित्या कमी दर दाखवले जात आहेत. वायदेबाजारात खरेदी करण्यात आलेल्या हळदीची गुणवत्ता, दर्जा आणि गोदामांतील प्रत्यक्ष स्थिती तपासल्यास, ठरवलेल्या मापदंडांमध्ये मोठी तफावत आढळते, असा आरोप त्यांनी केला आहे.

साखरेप्रमाणे हळद वायदेबाजारातून मुक्त करण्याची मागणी

शेट्टी यांनी यापूर्वी साखरेला वायदेबाजारातून मुक्त केल्याचा दाखला देत सांगितले की, त्या निर्णयामुळे साखरेचे दर स्थिर राहिले आणि शेतकरी व ग्राहक दोघांनाही फायदा झाला.
हळदही वायदेबाजारातून वगळल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणात राज्य सरकार आणि केंद्र सरकारने गंभीर दखल घ्यावी व हळद बाजारातील संभाव्य गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

हेही वाचा: सांगली जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना; शहरात जुन्या वादातून हत्या, तर जतमध्ये संशयास्पद मृत्यू.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा