Sangli Today | मिरज : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागे सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर महात्मा गांधी चौकी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी गौस गोपी बोजगार (वय ३२, रा. गुरुवार पेठ, मिरज) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. आंबेडकर उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या एका खोक्यातून अवैधपणे गॅस रिफिलिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. त्यावेळी संशयित गौस बोजगार हा एका रिक्षामध्ये गॅस सिलेंडरमधून रिफिलिंग करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गॅस सिलेंडर टाकी, वजनकाटा तसेच रिफिलिंगसाठी वापरली जाणारी मोटर असा एकूण सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी संशयिताविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून महात्मा गांधी चौकी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा: अंध बांधवांना आता सहजपणे ‘वाचता’ येणार; जिल्हा परिषद प्रशासनाचा अभिनव उपक्रम.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










