सांगली : जिल्ह्यातील बँकिंग, कृषी आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आर्थिक वर्ष 2025-26 साठी ठरविण्यात आलेल्या पतपुरवठा उद्दिष्टांची सद्यस्थिती आणि विविध शासकीय योजनांची प्रगती तपासण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीला राष्ट्रीयीकृत, खाजगी व ग्रामीण बँकांचे वरिष्ठ अधिकारी, नाबार्ड, भारतीय रिझर्व्ह बँक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र, कृषी विभाग तसेच विविध विकास महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सप्टेंबर अखेरपर्यंतच्या तिमाहीत बँकांनी केलेल्या उद्दिष्टपूर्तीचा आढावा घेण्यात आला. कृषी व संलग्न क्षेत्रे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), तसेच अन्य प्राथमिक व अप्राथमिक क्षेत्रांमध्ये वितरित करण्यात आलेल्या कर्जाबाबत सविस्तर चर्चा झाली. सांगली जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याच्या प्रगती अहवालावरही यावेळी लक्ष केंद्रित करण्यात आले.
शेतकरी, उद्योजक आणि युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सद्यस्थिती, प्रशिक्षण उपक्रम तसेच महामंडळांमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांकडून माहिती घेतली. जिल्ह्यातील आर्थिक उपक्रमांना गती देण्यासाठी बँकांनी समन्वयाने काम करावे, असे सूचित करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










