मिरज भुयारी गटारी कामासाठी दोन महिने वाहतूक बदल; 24 डिसेंबर ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यान प्रमुख रस्ता बंद

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
फोटो : प्रातिनिधिक छायाचित्र

सांगली : मिरज शहरात भुयारी गटारी योजनेअंतर्गत काम हाती घेण्यात येत असून, या कामामुळे काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दि. 24 डिसेंबर 2025 ते 24 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संबंधित रस्त्यावर सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.

भुयारी गटारीचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते केंब्रिज स्कूल तसेच परमशेट्टी हॉस्पिटल ते सांगली–मिरज मुख्य रस्ता या मार्गावर करण्यात येणार आहे. या कामामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या कालावधीत मिरज शहरातून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी झारीबाग चौक आणि वंटमुरे कॉर्नर मार्गाचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी दिशादर्शक फलक, पुरेसा प्रकाश तसेच आवश्यक वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, भुयारी गटारी योजनेचे काम सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे तसेच गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाबाबत राज्यस्तरावर चर्चा.

TAGGED:
Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा