सांगली : आगामी सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या मुंबई / महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार, या पहिल्या यादीत सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेतील दोन प्रभागांचा समावेश आहे.
प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 1 मधून सौ. संगिता सूर्यकांत खंडागळे यांना उमेदवारी देण्यात आली असून, प्रभाग क्रमांक 8 मधून नितीन विलास मिरजकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी समाजवादी पार्टीचे मुंबई / महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्या निर्देशानुसार जाहीर करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू असताना, समाजवादी पार्टीने सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेसाठी आपल्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची घोषणा केली आहे.
सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सध्या चांगलाच वेग येताना दिसत आहे. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांत एकूण १,९८५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून, यापैकी २५ उमेदवारांनी अधिकृतपणे नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. विविध प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या वाढत असून, आगामी दिवसांत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत आणखी गती येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: सांगली महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला तुफान वेग; चार दिवसांत १,९८५ अर्जांची विक्री.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










