सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला चांगलाच वेग येताना दिसत आहे. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांत एकूण १,९८५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून, यापैकी २५ उमेदवारांनी अधिकृतपणे नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.
आज एका दिवसातच ३१८ अर्जांची विक्री झाली आहे. तसेच १७ उमेदवारांनी विविध प्रभागांतून आपले नामनिर्देशन अर्ज सादर केले आहेत. अर्ज विक्रीच्या बाबतीत RO-६ क्षेत्र आघाडीवर असून त्या विभागात ३५७ अर्जांची विक्री झाली आहे. तर RO-४ क्षेत्रात सर्वाधिक १० नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्व रिटर्निंग ऑफिसर (RO) कार्यालयांत हेल्पडेस्कची सुविधा, सीसीटीव्ही देखरेख तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसार आणि पारदर्शकपणे राबवली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: जिल्हा परिषद विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य बजावावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










